पुणे लोकमान्य फेस्टिव्हलची रौप्य महोत्सवाकडे वाटचाल
पुणे : पुणे लोकमान्य नवरात्र उत्सवास या वर्षी २४ पुर्ण होत असून मागील वर्षी ‘ कोविड ‘ च्या संसर्गामुळे डिजीटल फेस्टीवल घेण्यात आला होता. या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तो संपलेला नाही म्हणून याही वर्षी हा फेस्टीवल डिजीटल करण्याचे ठरविले आहे .
या वर्षीच्या उत्सवास ‘ समाज भावनांचा उत्सव ‘ म्हणून त्याकडे पाहीले जाईल . या उत्सवात आम्ही सामाजिक , पर्यावरण , आरोग्य , सांस्कृतिक , राजकारण , कला , साहित्य , मनोरंजन , वारसा या विषयांवर विविध व्याख्याने , चर्चा , डिजीटल कार्यक्रम यातून जनतेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणार आहोत . यात पुणे शहरात जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विविध मान्यवर , अभ्यासक , लोकप्रतिनीधी , पत्रकार यांनाही निमंत्रीत केले जाणार आहे . यात प्रमुख्याने ‘ तीन सदस्यीय प्रभाग पध्दती ‘ अंबिल ओढा – कथा एक – व्यथा अनेक , तळजाई टेकडी विकास की ? , जागर स्त्री शक्तीचा इ . सह . अनेक प्रश्नावर चर्चासत्र घेणार आहोत . त्याच प्रमाणे तरुण – तरुणींना कलेचे व्यासपीठ उपलब्ध करुन देताना सोलो डान्स ग्रुप डान्स , कपल दांडीया , रॅप साँग , मेंहदी , रांगोळी , नेल आर्ट , हेअर स्टाईल या सारख्या विविध स्पर्धांचे आयोजन केले असून महाराष्ट्रातील शक्तीपीठे , पुणे जिल्ह्यातील देवींचे दर्शन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
याच कार्यक्रमात डॉ . मंजिरी भालेराव , योगश प्रभुदेसाई , विनीती देशपांडे , प्रिया फुलंब्रीकर , प्रणव गोखले , श्री . सौरभ मराठे इ.ची विविध विषयांवर दररोज व्याख्याने होणार आहेत . लाईव्ह होम मिनिस्टर हा संपूर्ण कुटुंबीयांकरीता गेम्स शो होणार आहे . या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या गेम्स क्वीन चैताली माजगावकर – भंडारी या असणार आहेत . या कार्यक्रमांचे प्रक्षेपण पुढील संकेत स्थळावर होणार आहे . www.punelokmanyafestival.com , fpunelokmanyafestival , Opunelokmanyafestival2020 , punelokmanyafestival2020 , सोशल मिडीयावर या लिंक व्दारे हे सर्व कार्यक्रम पहाता येतील व स्पर्धकांनीही Whats app No. 7897893454 या क्रमांकावर आपले व्हिडीओ पाठवावेत तसेच अधिक माहितीसाठी ९९७०७५६६०६ , ९०७५५५१५३० या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष अॅड . गणेश सातपुते यांनी केले आहे . या कार्यक्रमाचे आयोजन नरेश मित्तल , शुभांगी सातपुते , महेश महाले , चेतन पाटील , ऋषिकेश भोसले , आदित्य सातपुते , स्वप्नील नहार , गौरव सैतवाल , निता ससाणे इत्यादीनी केले आहे .
