Saturday, September 26, 2026
Latest NewsNATIONAL

रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना मिळणार 78 दिवसांचा बोनस

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने नॉन-गॅझेटेड रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगाराइतके उत्पादनक्षमता आधारित बोनस मंजूर केला आहे. यामुळे सुमारे 11.56 लाख नॉन-गॅझेटेड रेल्वे कर्मचाऱ्यांना फायदा होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज दिली. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

अनुराग ठाकूर म्हणाले की, वर्षानुवर्षे, प्रोडक्टिविटी लिंक बोनस रेल्वेच्या नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना मिळत आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार यावर्षीही रेल्वेच्या नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस दिला जाणार आहे.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading