Pune – गेल्या 24 तासात कोरोनाचे नवीन 162 रुग्ण तर 167 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून दीडशे च्या पुढे आज रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 162नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 167रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 17हजार 90इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 91हजार 233इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 4रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 2तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 2रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9040 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 1517रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 191रुग्ण गंभीर आहेत, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 6159 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
