जिद्द फाउंडेशन व ‘पीएसएफ’तर्फे दुष्यंत निकम यांना ‘पुणे भूषण पुरस्कार’
पुणे : जिद्द फाउंडेशन व पुणे सोशल फाउंडेशन (पीएसएफ) यांच्यातर्फे उद्योग व सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल क्लासिक ग्रुप ऑफ ड्रायक्लिनर्सचे संस्थापक दुष्यंत निकम यांना कै. लक्ष्मण शिंदे स्मृती ‘पुणे भूषण पुरस्कार’ सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रमुख, माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
दुष्यंत निकम यांनी क्लासिक ड्रायक्लिनर्सच्या माध्यमातून उद्योग आणि सेवा क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्पूर्ण आणि गुप्त स्वरूपाच्या ‘डीजीपी-आयजीपी’ परिषदेतही त्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल पुणे शहर पोलिसांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. अतिशय महत्वाच्या व्यक्ती असलेल्या कार्यक्रमांत लॉंड्री सेवा त्यांनी पुरवली आहे. निकम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रासह (महाराष्ट्र शासन) विविध शैक्षणिक संस्थांत लॉंड्री व्यवसायाचे प्रशिक्षण देतात. सामाजिक कार्यातही त्यांचा पुढाकार असतो.
