आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी
मुंबई : बॉलिवुड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईच्या किला कोर्टाने येत्या ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटच्या लिंक्स आढळून आल्यानेच आम्हाला आर्यनच्या चौकशीसाठी त्याची कोठडी हवा असल्याचा युक्तीवाद नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या वतीने करण्यात आला.
आर्यनसह मुनमुन आणि अरबाज यांनाही आज कोर्टात दाखल करण्यात आले होते. या दोघांनाही ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. एकुण आठ जणांना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. एनसीबीने कार्डेलिया क्रूझवर एनसीबीने टाकलेल्या धाडीनंतर आज एनसीबीने कोर्टाकडे १३ ऑक्टोबरपर्यंत कस्टडीची मागणी केली होती. एनसीबीने या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक केली आहे.
संपुर्ण प्रकरणात अनेक संशयित आरोपी आहेत ज्यांची अजून ओळख पटवयाची आहे त्यासाठी चौकशी गरजेची आहे. आर्यन खान हा पेमेंट करण्यासाठी कशाच्या माध्यमातून करायचं हे विचारताना दिसतोय. तसेच संपुर्ण संभाषणात बऱ्याच कोडवर्डचा वापर यात करण्यात आला आहे. आम्ही आरोपींच्या चौकशीदरम्यान जुहूमधील 9 व्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केले, अशीही माहिती एनसीबीने कोर्टात दिली.
व्हाट्सए चॅट माझ्या कस्टडीसाठी पुरेसे नाहीत. माझ्याकडे काही सापडलं आहे का ? किंवा इतर गोष्टींचाही विचार करावा. आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट एकत्र होते याचा अर्थ त्याच्यात साम्य आहे असं नाही, असेही मानेशिंदे यांनी कोर्टासमोर स्पष्ट केले. तीन आरोपीमध्ये फक्त 5 ग्रॅम चरस सापडलं, तरीही कोकेन एमडीएमए असा उल्लेख एनसीबीने अटकेवेळी केलाय असेही मानेशिंदे म्हणाले. कोणाकडून काय ड्रग्स सापडलं याची माहिती एनसीबीने दिली नाही.
