सुनील माने यांच्या वतीने स्वच्छतादूत तसेच पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान
पुणे : गणेश उत्सव काळात परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आहोरात्र काम केलेले पुणे महानगरपालिकेचे स्वच्छतादूत, पोलिस तसेच सुरक्षा रक्षक यांचा सत्कार आज भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या वतीने करण्यात आला. राष्ट्रपती महात्मा गांधी, देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, यांची जयंती तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहा अंतर्गत औंध रोड येथील शेवाळे हॉस्पिटल येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.
चिंतामणी हॉस्पिटलचे डॉ. आशीष डुंगरवाल, माऊंटवर्ड सोसायटीचे व्यवस्थापक राजेंद्र मुळे , सचिव विजयभाऊ मारू, पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक सौ. ज्योती माने, प्रभाग क्रमांक आठचे भाजप अध्यक्ष गणेशजी स्वामी आदि मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. खडकी युवा मोर्चा अध्यक्ष अजित पवार, महेंद्र कदम, सचिन घोरपडे,अंकल रावत, हिमांशु मुथय्या, सूरज ढोबळे, ऋषभ काळे, सौरभ कांबळे, योगेश केरकर, शशिकांत भालेराव, सुहास टेकवडे, सुनील दैठणकर, जितेंद्र गायकवाड, केतन गायकवाड, सागर कांबळे, आनंद माने, दीपक कांबळे, अतुल ओव्हाळ, अरुण बागडी, नितीन गायकवाड,संदीप पानसरे, विनोद भालेराव, अनिल माने, प्रतिक वाघमारे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सुनील माने म्हणाले, गणेश उत्सवाच्या काळात पुणे महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी, पोलिस तसेच सुरक्षा रक्षकांनी अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. गणेश विसर्जन काळात गणेश मूर्ती नदीत विसर्जन न करता एकत्रित केल्या तसेच निर्माल्य खतासाठी एकत्रित केले. हे करण्यासाठी त्यांनी लोकांचे प्रबोधनही केले. याद्वारे त्यांनी पर्यावरण व नदी प्रदूषण रोखण्यासाठी मोलाचे काम केले. त्याचप्रमाणे पोलिस तसेच सुरक्षा रक्षकांनी गणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. औंध – बोपोडी भागातील याच लोकांच्या कार्यकर्तुत्वाचा सन्मान करण्यासाठी कर्त्यव्य भावनेतून पीएमपीएलचे संचालक प्रकाश ढोरे व मी सत्कार सोहळा आयोजित केला. तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी स्नेह भोजन आयोजित केले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही स्वच्छतादूत, पोलिस तसेच वैद्यकीय कर्मचारी देशाचे खरे हीरो असल्याचे सांगीतले आहे. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत त्यांनी स्वत: रस्त्यावर उतरून स्वच्छता केली. त्यांच्याच आदर्श घेऊन कृतज्ञता भावनेने आज स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप कांबळे यांनी केले तर आभार भाजप युवा मोर्चा सरचिटणीस रोहित भिसे यांनी मानले.
