Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांचा सत्कार

पुणे : सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने ब्रिटीशांच्या जोखडातून देशाला मुक्त करून संपूर्ण विश्वाला सत्य अहिंसा सहिष्णुता शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी, जय जवान जय किसान हा मूलमंत्र देणारे स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस भोर वेल्हा मुळशी चे आमदार संग्राम थोपटे यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

विविध क्षेत्रांमध्ये बहुमूल्य योगदान देणाऱ्या  महेश हगवणे, पराग मते पाटील, मधुकर वांजळे, धर्मराज हांडे महाराज,  डॉ.  नंदकिशोर मते, संतोष चाकणकर, दत्ताजी नलावडे, विठ्ठल तांबे, निलेश बोरुडे, कल्याणराव अवताडे, सुनील सव्वाशे या मान्यवर व्यक्तींचा सन्मान आमदार संग्राम  थोपटे, संजय बालगुडे, श्रीरंग चव्हाण पाटील आणि गोपाळदादा तिवारी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

याप्रसंगी खडकवासला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल मते पाटील,जिल्हा परिषद सदस्य विलास मते पाटील, पुणे जिल्हा सरचिटणीस  शंकरराव दांगट,  हवेली तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रघुनाथ यादव,  विजय लगड, धनंजय पाटील संजय अभंग, केतन जाधव, सुहास धावडे,  माजी सरपंच प्रशांत नानगुडे, प्रा.  राजू मते पाटील, शंकरराव दांगट, सुरेश साळुंखे, ज्येष्ठ नेते नूर शेठ सय्यद, अध्यक्ष विजय मते पाटील, संदीप मते, आनंद मते, किरण मते, अनिल मते, रुपेश मते, रमेश महाराज मते, सुनील महाराज मते, ह भ प शेखर मते व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading