Thursday, July 30, 2026
Latest NewsPUNE

आकुर्डी परिसरात अकराशे नागरिकांनी घेतला मोफत लसीकरणाचा लाभ

पिंपरी : कोरोना या जागतिक महामारीवर विजय मिळविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सामाजिक संस्थांनी देखिल पुढाकार घेतला पाहिजे. या उद्देशाने आकुर्डी परिसरातील अकराशे नागरिकांना मोफत लसीकरण करण्याचा उपक्रम ज्येष्ठ उद्योजक विठ्ठलशेठ काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक धनंजय काळभोर यांनी यशस्वीपणे राबविला.

सप्टेंबर महिन्यातील चारही रविवारी आकुर्डी मधिल तुळजाभवानी माता मंदिरामागे हे मोफत लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. बाणेर येथिल खासगी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचा-यांनी लसीकरण केले. यासाठी गुरुवारी आणि शुक्रवारी नोंदणी आणि शनिवारी टोकन क्रमांक आणि वेळ देण्यात आली आणि नोंदणीकृत नागरिकांना मोफत लस देण्यात आली. आकुर्डी येथिल विठ्ठलशेठ सोमाजी काळभोर चॅरिटेबल फाऊंडेशन, श्री तुळजामाता मित्र मंडळ माऊली ज्येष्ठ नागरिक संघ आणि श्री तुळजाभवानी देवस्थान ट्रस्ट यांनी हे मोफत लसीकरण शिबीर आयोजित केले होते. हरिशचंद्र काळभोर, पुरुषोत्तम गोळे, चेतन काळभोर, अतुल बिबवे, अजित काळभोर, उत्तम काळभोर, मल्हारी काळभोर, ताराचंद्र काळभोर, मोहनराव करजुले, चंद्रकांत दत्तात्रय गळगट्टे आदी शिबीराच्या आयोजनात सहभाग घेतला. या शिबीराचा आकुर्डी परिसरातील अकराशे नागरिकांनी याचा लाभ घेतला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading