महाराष्ट्रीयन उत्तर भारतीय एकता मंचच्या अध्यक्षपदी अशोक दुबे यांची निवड
पुणे : महाराष्ट्रीयन उत्तर भारतीय एकता मंच MUBEM च्या बैठकी मध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी अशोक भाई दुबे यांची निवड करण्यात आली. मंचाच्या संस्थापक अध्यक्ष संगीता तिवारी यांनी ही घोषणा आज केली, अशोक दुबे हे शिवसेनेचे पदाधिकारी पण आहेत, ते कोंढवा मध्ये सामाजिक कामा मध्ये सक्रिय आहेत. आणि आता त्यांच्यावर संस्थेच्या माध्यमातून खुप जास्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
यावेळी कार्याध्यक्ष मनोज टी. मिश्रा, मुबेम चे महासचिव रंगनाथ पांडे, महासचिव सुरेश शुक्ला, सचिव अनिश पांडे उपस्थित होते.
आता संस्थेची नवीन कार्यकारिणी नवीन युगाची असेल आणि नवीन युवक शक्ति ची असणार, आम्ही सर्व महाराष्ट्रियन उत्तर भारतीय एकता मंच चे सदस्य सर्व समाजासाठी खूप काम करणार आहोत. तसेच आम्ही यूपीच्या निवडणुकां मध्येही सहभाग घेणार आहोत, एक वोट प्रगती के नाम हा उपक्रम राबविणार आहोत, संपूर्ण पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मधून अनेक तरुण -तरुणीही आमच्या बरोबर सामील होत आहेत. आम्ही आता आमची महिला संघटनाही मजबूत करणार आहोत. कोथरूड आणि कर्वे नगरमधूनही अनेक महिला सामील होत आहेत. उर्वरित कार्यकारीणी समिती देखील पुढील आठवड्यात आमच्या बैठकीत गठीत केली जाईल. असे संगीता तिवारी यांनी सांगितले.
