Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

B-TECH च्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत अभाविप चे MIT-WPU महाविद्यालय प्रशासनाला निवेदन

पुणे: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्ट मंडळाने MIT – WPU महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रशांत दवे यांची भेट घेतली. या भेटीत B-TECH च्या विद्यार्थ्यांना पहिली इंस्टॉल मेंट भरून परीक्षा देण्यास परवानगी द्यावी. जे विद्यार्थी पहिली installment भरू शकत नाहीत त्यांना अजुन मुदत द्यावी. परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख महाविद्यालयाने पुढे ढकलावी. तसेच international study tour च्या संदर्भात व्यवस्थित कल्पना विद्यार्थ्यांना कळवावी. अश्या मागण्या अभाविप ने महाविद्यालय प्रशासनाकडे केल्या.

तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एका installment वर परीक्षा फॉर्म भरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करणारे ई मेल केले असता महाविद्यालयाने अधिकृत सूचना न काढता विद्यार्थ्यांना मेल द्वारा फॉर्म भरण्यास परवानगी दिली आहे.
तरी सुद्धा अभाविप अशी मागणी करते की महाविद्यालयाने अधिकृत सूचना काढावी.
वरील मग्ण्यांपैकी परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख महाविद्यालयाने ५ ऑक्टोबर अशी केली असून इतर मागण्यांवर अधिकृत निर्णय अजुन महाविद्यालय प्रशासनाकडून आलेलं नाही. महाविद्यालयाने लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात नाहीतर अभाविप तीव्र आंदोलन करेल.असा ईशारा भाग संयोजिका शांभवी साले यांनी दिला आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading