Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाच्या 131 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी  असून दोनशे च्या खाली आज  रुग्ण सापडले  आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 171नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 131रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 13हजार  52इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 90हजार 779इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 12रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 2तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 10रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9033जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 1540रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 184रुग्ण गंभीर आहेत, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 7674 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply