Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

वज्र निर्धार लसीकरण महाअभियान २०२१


पुणे : कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून सामाजिक बांधिलकी जपत नारायण पेठ येथील पत्र्या मारूती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट आणि विजय मित्र मंडळ (भट बोळ) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात आली.यामधे निरामय आरोग्य संस्था, स्व-रुपवर्धिनी , बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनीक ,सीरम इन्स्टिट्यूट,पीपीसीआर, व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी सहभाग नोंदविला. पत्र्या मारूती मंदिराजवळील एन. के.ज इराणी टी कॅफे येथे सकाळी १० ते ४ पर्यंत ५१९ नागरीकांचे कोव्हिशील्ड पहिला डोस आणि दुसरा डोस देऊन मोफत लसीकरण
करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे पूजन आणि दिपप्रज्वलन करून या उपक्रमाची सुरुवात केली. दिलबागसिंग बीर.  दिलीप निकम, डॉ.राध्येशाम लाहोटी, नगरसेवक राजेश येनपुरे, नगरसेविका ऍड. गायत्री खडके, भाजयुमो पुणे शहर अध्यक्ष बाप्पू मानकर,निरामय संस्थेचे ज्योतीकुमार कुलकर्णी,स्व-वर्धिनीचे विश्वास कुलकर्णी पुष्पाताई धडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ऍड. प्रमोद बेंद्रे, सहसंचालक मोतीबाग नगर , अरविंद रावेतकर कसबा भागसंपर्क प्रमुख, महेशशेठ कार्यवाह मोतीबाग नगर, बाळासाहेब पाटोळे कसबा भाग सेवा शिक्षण प्रमुख,व स्वयंसेवक उपस्थित होते.सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करून कार्यकर्ते यांना शुभेच्छा दिल्या.व त्यांचा उत्साह वाढविला.या परिसरात फिरून लसीकरणासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी यावे यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि मोतीबाग नगरातील या. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.

सूर्यकांत (कांता) अनगळ व कौस्तुभ निकम यांच्या मू दोन्ही मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी नियोजन केले. या उपक्रमाची परीसरात नागरिकांना मध्ये चर्चा होती. कौस्तुभ निकम यांनी या उपक्रमासाठी आपले हॉटेल व सर्व कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दीला. व सर्वांसाठी लसीकरणानंतर चहाची व्यवस्था केली

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading