fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

तीन टप्यात एफआरपी देण्याच्या शिफारशी विरोधात भाजप किसान मोर्चाचे धरणे आंदोलन

पुणे: सद्यस्थितीत महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी ‘न भूतो’ अशा आर्थिक संकटातून जात आहे. शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने ऊसाची  एफआरपी  अजूनही दिली नाही  त्यामुळे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा ने महा विकास आघाडी सरकारच्या शेतकऱ्यांच्या या ऊसाच्या एफआरपी देण्याच्या शिफारशी विरोधात पुण्यात साखर आयुक्त कार्यालय येथे धरणे आंदोलन केले. 

या आंदोलनाच्या वेळी महाविकास आघाडी सरकार ने शेतकऱ्यांना उसाची एफआरपी  अजूनही दिली नसल्यामुळे सरकारचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष  वासुदेव नाना काळे यांनी केले. या आंदोलनाला किसान मोर्चाचे  सरचिटणीस मंकरड कोरडे, माजी आमदार बाळासाहेब मुरकटे, संजय थोरात, केशव कामठे, माऊली शेळके, संजय पाटील व शेतकरी उपस्थित होते.

वासुदेव नाना काळे म्हणाले,शेतकऱ्यांना महा विकास आघाडी सरकारने उसाची एफआरपी लवकरात लवकर दिली पाहिजे. राज्य सरकारने 2-3 वर्षे शेतकऱ्याच्या कडे लक्ष दिले नाही. राज्य सरकार मधले मंत्री शेतकऱ्यांकडे उसाच्या एफआरपी बाबत केंद्र सरकार कडे शिफारस केली आहे असे सांगतात.राज्यातील शेतकरी हा फक्त शेती करतो.
शेतकऱ्याना शेती मधून जे उपत्न भेटते त्या वर शेतकरी जगतो.जर राज्य सरकारने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना उसाची एफआरपी  एक रकमी जर दिली नाही तर देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशारा वासुदेव काळे यांनी दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading