व्यापक समाजहितासाठीची जिद्द आवश्यक: प्रा मिलिंद जोशी
पुणे : वैयक्तिक आशा आकांक्षांच्या पलीकडे जाऊन व्यापक समाजहितासाठी धरलेली जिद्द समाजासाठी उपकारक ठरते असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. रंगत संगत प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित जिद्द पुरस्कार सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते यावर्षीचा जिद्द पुरस्कार संजय विष्णू भोसले उर्फ श्वेतद्विपदास यांना.प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.त्या वेळी ते बोलत होते.
प्रा. जोशी पुढे म्हणाले, ‘माणसातल्या दिव्यत्वाचा त्याला परिचय करून देणे हे धर्माचे खरे काम आहे. धर्म माणसाला मोक्षाचा मार्ग दाखवतो, जिद्द हाच स्वप्ने साकार करण्याचा राजमार्ग आहे. प्रतिकूल परिस्थितीत माणसाची जिद्द तावून सुलाखून निघते. जिद्दी माणसांमुळेच समाजाची पावले पुढें पडतात आणि कामाचे डोंगर उभे राहतात. जिद्द असली तरच माणसाचे जीवनशिल्प देखणे होते.
‘संजय भोसले यांनी 47 लाख लोकांची भोजनाची व्यवस्था ,आदिवासी बांधवांना धान्यपुरवठा ,अण्णा मृत पार्थ योजनेद्वारा ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्यादानाचे पवित्र कार्य आपल्या हातून पार पडलं . गोमातेच्या ऋणांची जाणीव ठेवून गोशाळा यांचे जतन, संवर्धन आणि आर्थिक मदत आपण केली एकंदरीत सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अशा सगळ्या पातळीवरचे आपले कार्य स्पृहणीय आहे असे अड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात नमूद केले . .संजय भोसले आणि आनंद सराफ यांनी आपले मनोगत व्यक्त केले .यावेळी मैथिली आडकर, , पत्रकार आनंद सराफ, आदी उपस्थित होते सोहळ्याचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले .
पुरस्कार सोहळ्यानंतर निमंत्रित कवींचे कवी संमेलन संपन्न झाले.बंडा जोशी,उद्धव कानडे,सुजित कदम, संगीता पुराणिक, केतकी देशपांडे ..आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या .कवी संमेलन अध्यक्ष पद प्रभा सोनवणे यांनी भूषवले तर सूत्रसंचालन स्वाती सामक यांनी केले .
