Sunday, August 2, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यात पुढील ४८ तासात मुसळधार पाऊसाचा इशारा


पुणे:राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, कोकण, पालघर, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर विदर्भातील अनेक भागांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पुढील ४८ तासात मुसळधार पाऊसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

पालघर, रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्य़ामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यासाठी पावसासाठी पुढील २ दिवस अधिक महत्त्वाचे आहेत. या जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत वेगवान वाऱ्यांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व राज्यांमध्ये तर २२ ते २६ सप्टेंबर या दरम्यान राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्याभरात पावसाची संततधार पुढील काही दिवस कायम राहणार आहे.
मराठवाडा, कोकण आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या आणि मध्यम सरी कोसळणार आहेत. विदर्भात पुढील चार दिवस बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
मुंबईसह ठाणे भिवंडी, बदलापूर, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर आणि डोंबिवली पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने आज जोरदार हजेरी लावली. वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण परिसरात गारवा निर्माण झाला आहे. पालघर जिल्ह्यातही सलग तिसऱ्या तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading