सिट्रोनतर्फे दमदार आणि आधुनिक, नवी सी3चे अनावरण

आधुनिक आणि दमदार स्टाइल असलेली हॅचबॅक

डिझाइनच्या बाबतीत विशिष्ट स्थानिक गरजादमदारपणाआधुनिकप्रतिष्ठित रूप व राकटपणा यांचा विचार करून बांधणी करण्यास सांगण्यात आले होते.

आटोपशीर4 एमपेक्षा कमी लांब असलेल्या नव्या सीथ्रीची स्टाइल तिच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारावरून सहज लक्षात येते. त्याला उंच बॉनेट आणि रूंदी उठून दिसावी यासाठी फ्रंट एंड रचनेची जोड देण्यात आली आहे. त्याशिवाय सिट्रोनचा ठराविकत्याच्या संपूर्ण आणि भरदार मॉडेल्सचा परिचित आकार त्याच्या विविधकोरून काढलेल्या पृष्ठभागासह सजवण्यात आला आहे. नव्या सीथ्रीमध्ये सिट्रोनची इतर वैशिष्ट्येही सहज लक्षात येणारी असून त्यात सिट्रोनच्या नेहमीच्या बॉनेटचे स्टायलिंग आणि फ्रंट ग्रिलचे डिझाइन यांचा समावेश आहे.

ब्रँडच्या वैशिष्ट्यांनुसार सिट्रोनचे स्वरूप तिच्या सिग्नेचर फ्रंड एंडसह सीफोर आणि सीफाइव्हएक्ससह सध्याच्या श्रेणीमध्ये सादर करण्यात आले आहे. यामध्ये दुहेरी स्टेज लाइट सिग्नेचरदुहेरी शेव्हरॉनचा समावेश आहेजे क्रोम बार्स बनतात आणि वाहनाच्या रूंदीवरून हेडलाइट्सपर्यंत तसेच राहातात व अखेरीस वाय आकार तयार करण्यासाठी विलग होतात. हेडलाइट्स दोन स्वतंत्र घटकांपासून बनवण्यात आले असून त्याचबरोबर पोझिशन लाइट्स, इंडिकेटर्सवरच्या व खालच्या बाजूला दिवसा लावण्यासाठीचे दिवेलो बीमहाय बीम, वरच्या आणि खालच्या बाजूला दिव्यांसाठी मार्गदर्शकही देण्यात आले आहेत. मागील बाजूची लाइट सिग्नेचर बऱ्यापैकी ठळक असून पुढच्या बाजूला सहजपणे उठून दिसणाऱ्या दोन आडव्या रेषांशी सुसंगत व पर्यायाने त्रिकोण तयार करणाऱ्या आहेत.

पारंपरिक हॅचबॅकपेक्षा जास्त ग्राउंड क्लियरन्स (अतिरिक्त 110एमएम) खराब रस्त्यांवर अंडरबॉडीची खरवड निघू नये यासाठी तयार करण्यात आला आहे. या क्षेत्रात ते 180 एमएमसह आघाडीवर असलेल्यांपैकी एक आहे.

ग्राउंड आणि वाहनाच्या ओव्हरअँगलमधील अप्रोच अँगलचा (पुढील बाजूस) आणि डिपार्चर अँगल (मागील बाजूस) बारकाईने अभ्यास करण्यात आला असून तीव्र उतारखराब रस्ते किंवा रस्त्यांवरील अडथळ्यांमुळे पृष्ठभागाला स्पर्श होऊ नये यासाठी त्याप्रमाणे बॉडीवर्क्सची रचना करण्यात आली आहे. भारतात उदा. 5.5 दशलक्ष किलोमीटर्सचेजगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे आहे. मात्र55 टक्के रस्त्यांवर योग्य पृष्ठभाग नाही. स्थानिक टीम्सने दिलेल्या अहवालांनुसार सिट्रोनने अर्थातच हा मुद्दा विचारात घेऊन नव्या सीथ्रीची रचना केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: