खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये 99.94 टक्के पाणीसाठा

पुणे:गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे पूर्णपणे भरली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. धरणं काठोकाठ भरल्याने आता पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंताही मिटली आहे. त्यामुळे येत्या पाच-सहा महिन्यात पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार नाही.

खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी विजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये सध्या 99.94 टक्के पाणीसाठा आहे. पाऊस आणखी काही दिवस सुरु राहिला तर धरणे शंभर टक्के भरतील.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग
पाण्याच्या विसर्गाला सुरुवात झाली आहे. खडकवासला धरणातून 5136 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र, सकाळी 11 वाजल्यापासून तो कमी करुन 2568 क्युसेक्सवर आणण्यात आला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: