‘आयव्हीएफ’ उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आणण्याचा विचार – राजेश टोपे

पुणे : सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याकरता एशियन डेव्हलपमेंट बँकेकडुन पाच हजार कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. यातुन ग्रामीण रुग्णालय सक्षम होण्यास मदत होईल. आरोग्य विभागाच्या रिक्त जागा महिन्याभरात भरल्या जातील. नवीन ऍम्ब्युलन्स प्रस्तावित आहेत. कोरोना काळातील अनुभव लक्षात घेऊन अनेक बदल होत आहेत. उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरी दिली जात आहे. नवीन ऍम्ब्युलन्स प्रस्तावित आहेत. चांगल्या आरोग्य सुविधासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रयत्न होताहेत. एक अर्थाने सार्वजनिक आरोग्य विभाग कात टाकत आहे. दुसरीकडे तालुकास्तरावर आयव्हीएफ’ तंत्रज्ञान उपलब्ध करून देत डॉ. अरगडे  दांपत्यांना आनंद देत आहेत. आयव्हीएफ’सारखे उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कक्षेत आणण्यासाठी आरोग्य विभागही प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. 

चाकण येथील अरगडे हॉस्पिटल व प्रसूतिगृह संचालित खेड-जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील पहिल्या नेस्ट आयव्हीएफ सेंटर अर्थात टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या उद्घाटन राजेश टोपे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. प्रसंगी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, ज्येष्ठ नेते डॉ. रत्नाकर महाजन, माजी आमदार राम कांडगे, ज्येष्ठ फॅमिली फिजिशियन व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश अरगडे, अरगडे हॉस्पिटलचे संचालक डॉ. असित अरगडे, ऍड. सुप्रिया अरगडे आदी उपस्थित होते.

यावेळी टोपे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये तहसीलदार वैशाली वाघमारे, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, सिव्हिल सर्जन डॉ. अशोक नांदापूरकर, पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, चाकण नगरपरिषद मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, खेड नगरपरिषद मुख्याधिकारी प्रकाश पाटील, आळंदी आरोग्याधिकारी डॉ. गणपतराव जाधव, चाकण आरोग्य अधिकारी डॉ. नंदा ढवळे, चांडोली आरोग्याधिकारी डॉ. भगवान काकणे, खेड तालुका आरोग्याधिकारी डॉ. बळीराम गाढवे, पत्रकार हरिदास कड, हणमंत देवकर, कल्पेश भोई, गणेश अहेरकर आदींचा सन्मान करण्यात आला.

दिलीप मोहिते पाटील म्हणाले, उपचारासाठी आता पिंपरी-चिंचवड, पुण्यात जाण्याची गरज भासणार नाही. या भागातील रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार आता इथेच उपलब्ध होतील. वंध्यत्वासारख्या समस्येवर उपचार उपलब्ध झाल्याने येथील रुग्णांची परवड होणार नाही. वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी अरगडे पिता-पुत्र डॉक्टरांचा आदर्श घ्यावा. लोकांना परवडेल अशा स्वरूपात ही सेवा उपलब्ध करून द्यावी.

 

Leave a Reply

%d bloggers like this: