इकोल स्पोर्ट्स फाउंडेशन – २२ यार्ड्स, पीवायसी, केडन्स, जिल्हा संघ उपांत्य फेरीत

पुणे : २२ यार्ड्स, पीवायसी व केडन्स संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना इकोल स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना मैदानावर झालेल्या लढतीत २२ यार्ड्स संघाने निर्धारित ५० षटकांत ७ बाद ३०२ धावा केल्या. यात तेजस तोळसनकरने १२५, श्रेयस केळकर ६०, गौरव कुमकर याने ४४ धावा करताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. वरद काणे व रुद्राज घोसाळे यांनी प्रत्येकी २ तर गौरव शिंदेने १ गडी बाद केला. डेक्कन जिमखाना संघाने ४९.५ षटकांत सर्व बाद २८६ धावा करताना चांगली लढत दिली. अथर्व वणवेने ७१, अजय बोरुडेने ६९ व अथर्व सणसने ३१ धावा करताना चांगली लढत दिली. हर्षवर्धन पाटील व गौरव कुमकर यांनी प्रत्येकी ३ तर रोहन वाघसरे व अथर्व शिंदे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

पीवायसी मैदानावर झालेल्या लढतीत ब्रिलियंट्स संघाने ४३.१ षटकांत सर्व बाद १८१ धावा केल्या. यात उत्कर्ष चौधरी ६१, साहिल औताडे ५० तर अली खान २२ यांनी संघाच्या धाव संख्येला आकार दिला. अब्दुस सलाम व स्वराज चव्हाण यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. पीवायसी संघाने हे आव्हान केवळ ३६.२ षटकांत ४ गाड्यांच्या मोबदल्यात पार केले. सोहम शिंदे ५३, यतींद्र कार्लेकर ४४, स्वराज चव्हाण ४२ धावा करताना संघाला विजय मिळवून दिला. स्वराज चव्हाण सामन्याचा मानकरी ठरला.

येवलेवाडी मैदानवार झालेल्या लढतीत केडन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत सर्व बाद २२९ धावा केल्या. अनिरुद्ध साबळेने ८६, तनिष्क खेडकरने ५५ तर आर्यन गोजे याने ३१ धावा करताना संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली. मिर्जा बेग व सार्थक वाळके यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. मेट्रो संघाला हे आव्हान पेलवले नाही. मेट्रो संघाला ४३.३ षटकांत केवळ १८१ धावाच करता आल्या. यात शशिकांत पवार ७६, संकेत पाटील ५३ यांनी चांगली लढत दिली,

जिल्हा संघ व अम्बिशियस संघादरम्यानची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. व दोन्ही संघांना समान गुण देण्यात आले. गुणाच्या जोरावर जिल्हा संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Leave a Reply

%d bloggers like this: