fbpx

सामाजिक संस्थांसमवेत मेधा पाटकर यांची कोकणातील पूरग्रस्त गावांना भेट

पुणे : ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्यासमवेत मेहर अली सेंटर, राष्ट्र सेवादल, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय ( एन ए पी एम )आणी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप या संस्थांच्या प्रतिनिधींनी पूरग्रस्त कोकण भागाला भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांच्या अडचणी समजावून घेतल्या.

माणगाव, महाड, तळये या भागातील पीडीत नागरीकांना भेटून त्यांच्या पुनर्वसनाच्या मागण्या व वारंवार होत असलेले निसर्गाच्या घटनाबाबत तेथील ग्रामस्थ, सरपंच, समाजसेवक यांच्याशी सखोल चर्चा करण्यात आली.

अनधिकृत बांधकामे निसर्ग मधील बदल डोंगर पोखरणी आणी चुकीच्या पद्धतीने तयार होत असलेला महामार्ग यामुळे असे प्रकार वारंवार येथे घडणारच यावर राज्य आणि केंद्र सरकार यांनी ठोस उपाय योजना करावी निसर्गाशी होणारा खेळ थांबवावा, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

यावेळी पुण्यातून इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान, एन ए पी एम च्या राष्ट्रीय समन्वय सुनिती सु.र., इब्राहिम खान, राष्ट्र सेवा दलाचे वरिष्ठ पदाधिकारी विलास किरोते, मनिष देशपांडे आणि मेहर अली सेंटर संस्थाचे कार्यकर्ते या दौऱ्या मध्ये सामील होते.

कोकण घटनेचा अहवाल आणि निवेदन बनवून पर्यावरण मंत्री आणि महाराष्ट्रचे मुख्यमंत्री यांना देणार आहोत, असे मेधा पाटकर यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: