fbpx
Sunday, May 26, 2024
Latest NewsPUNE

शिरवलीला मिळाला मदतीचा प्रकाश

पुणे : अतिवृष्टी चा तडाखा बसलेले महाबळेश्वर तालुक्यातील शिरवली हे 40 ते 45 कुटुंबाचे गाव .पावसाच्या पाण्यात शेतीवाडी आणि उभे संसार वाहून गेले .रस्ते वाहून गेले ,वीज नाही.मदत घ्यायची म्हटलं तरी जंगलातून मेटतळे या यावे लागते .
अशा या दुर्गम गावातील लोकांना मदतीचा हात देण्यासाठी नांदेड सिटी मैत्र कट्टा आणि नवज्योत मित्र मंडळ येरवडा यांनी पुढाकार घेतला जय गणेश व्यासपीठ पुणे ह्यांचे सहकार्य लाभले
दीप अमावस्येचे निमित्त प्राथमिक व माध्यमिक अशा साधारण 24 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देत दिप आमावस्या निमीत्त शिक्षणाचा ज्ञानदिप प्रजवलीत करून पूजन करण्यात आले, व 41 कुटुंबाना महिनाभर पुरेल इतके किराणा व जीवन आवश्यक साहित्य देण्यात आले.

दीप पूजनाच्या निमित्ताने सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी दिपपूजन केले .संकटाच्या अंधारावर मात करून नव्याने उभे राहण्याचे बळ सर्वाना मिळो ,अशी प्रार्थना करण्यात आली .
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना पियुष शहा म्हणाले,”कितीही संकटे आली तरी त्यावर पाय देऊन भक्कमपणे उभे रहा.संकटांशी मुकाबला करा.ज्या गणेशोत्सवाचा समृद्ध वारसा आपण चालवतो त्या लोकमान्य टिळकांचे विचार अंमलात आणा. आम्ही कार्यकर्ते त्याच तत्वांवर चालतो .”हा संदेश विद्यार्थ्यांना देत त्यांनी शिक्षणात पुस्तक वाचनाचे महत्व सांगितले.
“गणेश मंडळाचे कार्यकर्ते म्हणून मानवतेच्या भूमिकेतून आम्ही या संकट काळात आपल्याला सहकार्य करून आमचे कर्तव्यच करत आहोत “,असे विचार नवज्योत मित्र मंडळ येरवडा चे अध्यक्ष अमित जाधव यांनी मांडले.
याप्रसंगी नांदेड सिटी मैत्री कट्टा चे विवेक चितोरकर, अमोल कळमकर, मयूर पाटील आशिष चौधरी , बाळासाहेब निचल ,नवज्योत मित्र मंडळाचे अध्यक्ष अमित जाधव , जय गणेश व्यासपीठ चे कार्यकर्ते अभिषेक मारणे, पियुष शहा , प्रसाद राऊळ ,वाई मधील शिक्षक शेखर जाधव , शाहीर शरद यादव सर ,अभिजित सणस उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading