Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

‘लोकमान्यांना’ रंगावली व १०१ दिव्यांतून मानवंदना

पुणे : स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणा-या लोकमान्य टिळकांना रंगावलीतून अभिवादन करण्यात आले. लोकमान्य टिळकांच्या १०१ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने १०१ दीप प्रज्वलित करुन त्यांच्या कार्याचे स्मरण देखील उपस्थितांनी केले.

निमित्त होते, जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट, न-हे तर्फे लोकमान्य टिळक यांच्या १०१ व्या पुण्यतिथीनिमित्त साकारलेल्या भव्य रंगावलीचे. टिळकांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू सांगणारी ही रंगावली २० बाय २० फूट आकारामध्ये साकारण्यात आली. जाधवर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, सुरेखा जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. रंगावलीकार सुनील सोनटक्के व वैशाली सोनटक्के यांनी चार तासांमध्ये ही रंगावली साकारली.

सुरेखा जाधवर म्हणाल्या, लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सवातून समाजाला एकत्र केले. त्यातून स्वातंत्र्याचा लढा उभारता येतो, अशी प्रेरणा सामान्यांना दिली. त्यामुळे रंगावलीमध्ये हे दोन्ही उत्सव आणि १०१ दीप प्रज्वलित करुन त्यांना मानवंदना देण्यात आली. पुढील दोन दिवस ही रंगावली संस्थेच्या प्रांगणात पाहण्यासाठी खुली राहणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading