राजकुमार हिरानी च्या आगामी चित्रपटात झळकणार शाहरुख आणि काजोल
बॉलीवूड मधली एव्हरग्रीन जोडी म्हणजे शाहरुख खान आणि काजोल. ही आयकॉनिक जोडी आपल्याला पुन्हा एकदा एकत्र बघायला मिळणार आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या आगामी चित्रपटातून ही जोडी एकत्र काम करणार आहेत. अद्याप टायटल न ठरलेल्या या चित्रपटात शाहरूख आणि काजोल पती- पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. राजकुमार हिरानी हे स्थलांतरावर आधारित चित्रपट बनवणार आहेत. हा चित्रपट एक सोशल कॉमेडी असणार आहे. पंजाब ते कॅनडा प्रवास करणाऱ्या कुटुंबाची ही कथा असेल या चित्रपटात कुटुंबाचा प्रवास कव्हर करणाऱ्या रिपोर्टरच्या भूमिकेत अभिनेत्री तापसी पन्नू ला विचारणा झाली आहे, तर शाहरुख खान ला मदत करणाऱ्या एका महिलेच्या भूमिकेत विद्या बालन दिसू शकते अशी चर्चा आहे. राजकुमार हिरानी यांच्या या चित्रपटाचे चित्रीकरण पुढील वर्षी एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. चित्रपटाला संगीत शांतनु मोईत्रा देणार आहे तर गीते स्वानंद किरकिरे लिहित आहेत.
