Thursday, June 18, 2026
BusinessLatest NewsTECHNOLOGY

टाटा टेलिसर्व्हिसिस आणि झूम यांच्यात उपक्रमांना युनिफाइड कम्युनिकेशन्स सोल्यूशन प्रदान करण्यासाठी भागीदारी  

पुणे : टाटा टेलिसर्व्हिसेस, या देशाच्या अग्रगण्य डिजिटल सेवा प्रदात्याने झूम व्हिडिओ कम्युनिकेशन्स, इंक या जगातील आघाडीच्या व्हिडिओ संप्रेषण प्लॅटफॉर्म, यांनी जगभरातील व्यक्तींना तसेच उद्योगांना, एक अंतर्ज्ञानी, स्केलेबल आणि सुरक्षित संप्रेषण उपाय देऊ करण्यासाठी हात मिळवणी केली आहे. टाटा टेलिसर्व्हिसेस, झूमच्या मजबूत आणि सुरक्षित प्लॅटफॉर्म मार्फत, सीमलेस युनिफाइड कम्युनिकेशन्स साठी उद्योगांच्या वाढत्या सहयोगाची गरज भागवेल.

खंडित संप्रेशन आणि परिणामी उत्पादनक्षमतेचे नुकसान यामुळे बऱ्याच उद्योगांना वाढीव रिमोट वर्किंग आणि ऑफिसपासून दूर राहत काम करण्याच्या कालावधीत होत असलेल्या विस्ताराला तोंड द्यावे लागते. काम कुठल्याही ठिकाणी आणि कामाता लवचिकता या बाबी भविष्यात नेहमीच्या आणि साध्या परंतु शक्तिशाली बनणार आहेत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सोल्यूशन्स महामारी नंतरच्या काळात कामाच्या ठिकाणी यशस्वी होण्याचा एक अविभाज्य भाग असतील. व्हिडिओ कम्युनिकेशन्स हे कामाच्या ठिकाणी भविष्याला आकार देत आहे आणि झूम त्याच्या नाविन्यपूर्ण, वापरास सोप्या , स्केलेबल आणि अंतर्ज्ञानी संप्रेषण प्लॅटफॉर्मसह अग्रस्थानी आहे.टाटा टेलिसर्विसेस वरिष्ठ उपाध्यक्ष विशाल रैली म्हणाले की, टाटा टेलिसर्व्हिसेसमध्ये, आम्ही व्यवसायांना ‘डिजिटल प्रथम’ मानसिकता बाळगण्यासाठी प्रोत्साहित करतो तसेच त्यांच्या ग्राहक अनुभवात वाढ आणि सुधारणा करतो. आमच्या अत्याधुनिक, उच्च क्षमत्याच्या डिजिटल कनेक्टिव्हिटी नेटवर्कवर एंटरप्रायझेसना एक निर्बाध आणि सर्वोत्तम युनिफाइड व्हिडिओ कम्युनिकेशन अनुभव प्रदान करण्यासाठी आम्ही झूम सह सहयोग करत आहोत. भारतीय बाजारपेठेला त्यांच्या नाविन्यपूर्ण सहयोग सोल्युशन्स पुरवण्यास उत्सुक आहोत.

झूम इंडियाचे महाव्यवस्थापक समीर राजे म्हणाले की टाटा टेलिसर्व्हिसेस च्या वाढत्या ग्राहकांना आमच्या अत्यंत अंतर्ज्ञानी, सुरक्षित आणि सर्व समावेशी व्हिडिओप्रथम संप्रेषण प्लॅटफॉर्म देऊ करतो जे त्यांना विविध खांदा दरम्यान क्रॉस फंक्शनल बैठका, रिअल टाइममध्ये घेण्यासाठी सक्षम करेल. झूमने भारतात गुंतवणूक केली असून बऱ्याच भारतीय व्यवसाय, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि इतर संस्थाना एकमेकांशी जोडलेले राहण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टीने कार्यरत आहेत . टाटा टेलिसर्व्हिसिससह मजबूत नेटवर्क पोहोचवत, आम्ही जागतिक दर्जाचे व्हिडिओ संप्रेषण अनुभव प्रदान करण्यासाठे आणि स्थानिक बाजारपेठेतील नवीन आणि सतत बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतात आमचे अस्तित्व वाढवण्याची योजना आखत आहोत. “

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading