Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune Metro – वनाज ते आयडियल कॉलनी ट्रायल रन यशस्वी

पुणे : पुणेकरांचे मागील अनेक वर्षांपासून स्वप्न असलेली पुणे मेट्रो अखेर गुरुवारी सकाळी प्रत्यक्षात धावली. आज वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्याची चाचणी करण्यात आली. या टप्प्यातील मेट्रो ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. चाचणीनंतर ऑक्टोबर अखेपर्यंत मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्याचे महामेट्रोच्या विचाराधीन आहे.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेता गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, महा मेट्रोचे ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिके अंतर्गत वनाज ते गरवारे महाविद्यालय या मेट्रो मार्गिके ची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. एकूण पाच किलोमीटर लांबीचा हा टप्पा आहे. या मार्गावर मेट्रोने सरावपूर्व चाचणी घेतली होती. ही मार्गिका उन्नत असून रूळ टाकण्यासह विद्युत तारांची कामे पूर्ण झाली असून मार्गिके अंतर्गत काही मेट्रो स्थानकांची कामेही पूर्ण झालेली आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading