fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest News

रिब्रँडिंग कँपेन यशस्वी करण्यासाठी ५ गोष्टी

कंपनीचे नाव, लोगो, वेबसाइट, अॅप आणि सध्याच्या डिझाइन्स बदलण्यापासून ते नव्या सुविधा व उत्पादने आणण्याद्वारे रिब्रँडिंग हे प्रभावीपणे बदलाशी संवाद साधते आणि मार्केटमध्ये कंपनीचे एक अढळ स्थान निर्माण करते. रिब्रँडिंग प्रक्रियेचे यश अनेक घटकांवर अवलंबून असते. रिब्रँडिंग कँपेन अधिक प्रभावी होण्यासाठीच्या ५ महत्वपूर्ण घटकांबद्दल सांगताहेत एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी.

नेतृत्वाची वचनबद्धता:रिब्रँडिंग प्रक्रियेत कंपनीच्या वरिष्ठ नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची असते. कंपनीची नवी ओळख सादर करण्याच्या कल्पनेच्या दृष्टीकोनावर हे पूर्ण कँपेन अवलंबून असतके. रिब्रँडिंगच्या कारणांवर नेतृत्वाचे समाधान नसेल, तर हे प्रक्रियेत दिसून येईल आणि याचे परिणामही त्यावर अवलंबून असेल.

योजना आखणे: एक योजना आखणे हा रिब्रँडिंग प्रक्रियेचा पाया आहे. ब्रँडची नवी ओळख सादर करण्याची संकल्पना जाहीर करावी लागेल. यात लाँचिंगच्या तारखेपासून प्री-इव्हेंट आणि पोस्ट इव्हेंटचा सराव इथपर्यंत सर्व समाविष्ट असेल. मूळात, हे प्रत्येक विभागाने अंतिम टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी  चेकपॉइंटच्या मुदतीसह अंमलात आणायचे हे कॅलेंडर आहे. कंपनीची नवी स्थिती टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा दमदार धोरण आखावे लागेल.

योग्य मार्केटिंग: तुम्ही जगातील सर्वात चांगल्या सेवा देत असाल, मात्र लोकांना याविषयी माहितीच नाही तर आपली किती उत्पादने बाजारातील उत्पादनांपेक्षा चांगली आहेत आणि कशी चांगली आहेत, यावर विचार करून काहीच फायदा नाही. प्रभावी मार्केटिंग तेच आहे, जे आपल्या उत्पादनांना कंपनीतून ग्राहकांपर्यंत घेऊन जाईल.

योग्य कंटेंटसह प्रभावी प्रसार: कंटेंट या माध्यमाद्वारे कंपन्यांना रिब्रँडिंगविषयी आपल्या ऑडियन्ससोबत प्रभावीपणे संवाद साधण्यास मदत होते. तसेच कंपनीचा वारसा प्रभावीपणे सांगण्यास मदत होते. एक बिझनेस कोणत्याही स्वरुपात स्वत:ची कहाणी सांगत असतो.- टेक्स्ट, छायाचित्र, व्हिडिओ किंवा ऑडिओ. आपल्या ब्रँडच्या सभोवती एक संमोहक कथा, जी वारशातून ताकद मिळवते,

यशाचा मागोवा घेणे: रिब्रँडिंगचे प्रयत्न सुरु होतात, तेव्हा त्याविषयी विसर पडता कामा नये. हा प्रवास रोमांचक आणि आव्हानात्मक असा दोन्ही प्रकारे असू शकतो. मात्र हे किती सार्थक आहे, हे परिणामांनंतरच कळते. त्यामुळे रिब्रँडिंगच्या परिणामांचा नेहमी मागोवा घेत रहा. ग्राहक यावर काय प्रतिक्रिया देतात, माध्यमांचे काय मत आहे, सोशल मीडियावर काय चर्चा आहे, हे पहात रहा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading