‘त्यांच्या’ संघर्षाला हवंय तुमचं पाठबळ
पुणे : वय अवघे 20 वर्षे, नाव पुजा लांगे. गाव अहमदनगर जिल्हयातील नेवासा. सध्या पुण्यातील सदाशिव पेठेत रहात असून बीए द्वितीय वर्षात आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये शिकतेय. घरची परिस्थितीती आधीच बेताची, त्यात करोनामुळे तर अधिकच हाल. अशा वेळी शैक्षणिक आणि दैनंदिन खर्च तरी भागवायचा कसा? हाच मूलभूत प्रश्न आणि स्वप्न तर अधिकारी होण्याचं. अशा वेळी करणार तरी काय? अशा बिकट प्रसंगी या महत्त्वाकांक्षी मुलीला सहकार्य मिळाले ते रुम पार्टनर असलेल्या सुकन्या व हिना या दोन मैत्रिणींचे. त्याही ग्रामीण भागातील तिच्याच वयाच्या आणि त्यांचीही अशीच बिकट परिस्थितीती. पण उदरनिर्वाहासाठी तिघींचीही धडपड सुरू आहे.
या तीनही मैत्रिणींनी ठरवलं काम करुन खर्च भागवायचा. तर पुजा ने मैत्रिणींच्या मदतीने थोडेसे भांडवल उभे केले. उदरनिर्वाहासाठी ती चहा बनवून थरमासमध्ये घेउन स्वतः पायी चालत आजूबाजूच्या अभ्यासिका आणि वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाउन विकते. हा चहाचा छोटासा व्यवसाय तीने लॉकडाउन नंतर सुरु केलाय. तसे एक दृष्टीने पाहिल्यास यातून रक्कम किती मिळते ही गौष्ट गौण आहे, कित्येकदा तिचा खर्च भागतही नाही.
पण कोणत्याही प्रकारच्या परिस्थीतीचा बाउ न करता मोठया हिमतीने व चिकाटीने या मुली करोनासारख्या अालेल्या कठीण संकटासोबतच परिस्थितीवर मात करतायेत. हेवा वाटावा खूप अस हा संघर्ष आहे. या विदयार्थीनीची कष्ट करण्याची तयारी व सकारात्मकपणा सर्वांच्याच डोळयात झणझणीत अंजन घालणारी नक्कीच आहे. या तिघीही स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. पुजा चहा वाटपाबरोबरच काही वेळ लायब्ररीत समन्वयक म्हणुन काम करते. गेल्या दोन वर्षापासुन त्या पुण्यात राहतात. सर्वकाही त्यांना नवीनच आणि वयही लहान, पण हतबल न होता अहोराञ संघर्ष करतायेत. त्यांना गरज आहे आपल्या पाठबळाची. या विद्यार्थिनींना तुम्ही खाली दिलेल्या बँक खात्यावर आर्थिक मदत करू शकता. अधिक माहितीसाठी कुलदीप आंबेकर (स्टुडंट हेल्पींग हँड, अध्यक्ष) यांना 9689794776 या क्रमांकावर संपर्क करू शकता.
Ac/no.11290100009481
Ifsc- BARB0SADASH(fifth character is zero )
SUKANYA SURESH GAIKWAD
HEENA SHAIKH
Ac/no: 32021120088
Ifsc code: SBIN0003674
bank of Maharashtra Ac no. 25047303029
Ifsc code: MAHB0001220
PUJA SURESH LANGHE
