Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावे, याकरीता पंतप्रधानांना भेटून देणार निवेदन

पुणे : थोर समाजसेवक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावे, यासाठी गेली अनेक वर्षे भारतीय जनता पार्टी पुणे शहर ओबीसी मोर्चासह अनेक संघटना प्रयत्नशील आहेत. मोर्चाचे अध्यक्ष योगेश पिंगळे यांना महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून देखील याबाबतचे विनंतीपत्र प्राप्त झाले असून पुढील आठवडयात दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे.

महापौरांनी नुकतेच ही विनंती पत्र मोर्चाचे अध्यक्ष योगेश पिंगळे व सहका-यांकडे सुपूर्द केले. यावेळी अमोल पांडे, यशोधन आखाडे, शंतनू नारके, बंडू कचरे, ओंकार माळवदकर, विशाल केदारी, दिनेश रासकर आदी उपस्थित होते.

योगेश पिंगळे म्हणाले, सन २००५ पासून आम्ही याबाबत मागणी करीत आहोत. पहिली महिलांची शाळा भिडे वाडा येथे १८४८ साली फुले यांच्यामुळे सुरू झाली. त्यामुळे पुणे मनपाने देखील याबाबत ठराव केला असून पंतप्रधानांना विनंती केली आहे. भाजपा पुणे शहर ओबीसी मोर्चाची ही मागणी पुणे मनपा ने मान्य केली असून केंद्र सरकारने फुले यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी आम्ही दिल्ली येथे पंतप्रधानांना भेटून करणार आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading