Friday, September 4, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

नाना पटोले यांचा बारामती येथील ओबीसी महामोर्चासाठीचा दौरा रद्द

पुणे : “ओबीसी-समाज आरक्षण प्रश्नी” महाराष्ट्रातील सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांचा ऊद्या गुरवार दि २९ रोजी बारामती येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा नाना पटोले यांच्या ऊपस्थितीत होणाऱ्या पुर्व नियोजीत महामोर्चास “कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्त मदत पुनर्वसनाच्या कार्यामुळे पोहोचणे अशक्य असल्याचे, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी ‘प्रसिध्दी पत्रका’द्वारे कळविले आहे.

सदर “ओबीसी आरक्षण प्रश्न” राज्यातील पुरपरीस्थिती आटोक्यात आल्यावर लवकरच घेण्यात येईल व तसे संबंधितांना प्रदेश काँग्रेस कडून कळविण्यात येईल असेही गोपाळदादा तिवारी यांनी सांगीतले.. ओबीसी व धनगर समाजाचे प्रश्न आपल्यासाठी प्राधान्यक्रम आहे, परंतू या “पुरआपत्ती प्रसंगी” आपत्तीग्रस्तांना मदतीची गरज अधिक आहे, त्यामुळे सदर बारामती दौरा रद्द करावा लागत आहे, किंबहूना सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रसंगी पुरग्रस्तांच्या मदतीस घावून जाणे महत्वाचे असून, सर्वांनी आपत्ती ग्रस्तांना मदत करावी असे आवाहन करत असल्याचे देखील मा नाना पटोले यांनी कळवल्याचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले..

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading