Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

भारतीय संस्कृतीत गुरुला परब्रह्माचे स्थान ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.न.म.जोशी यांचे मत

पुणे : गुरु हा साक्षात परब्रह्म असतो. भारतीय संस्कृतीमध्ये परब्रह्माचे स्थान गुरुला दिलेले आहे. जीवनाला आकार देतो, म्हणून गुरुला परब्रह्म म्हटले आहे. जगातील सर्व देशांच्या परंपरेमध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.न.म.जोशी यांनी व्यक्त केले.

जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्यावतीने गुरुवर्यांचा कृतज्ञता गौरव कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक डॉ.न.म.जोशी यांचा त्यांच्या निवासस्थानी जावून सन्मान करण्यात आला. यावेळी जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. सन्मानचिन्ह, शाल असे सन्मानाचे स्वरुप होते.

डॉ.न.म.जोशी म्हणाले, क्रांतीची मशाल हाती घेऊन संकटाविरोधात उभे राहणारे गुरु होते. आज ब्रिटीशकालीन शिक्षण पद्धती सुरु असली, तरी अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देत त्यांचे जीवन घडवत आहेत. गुरुपरंपरा मानण्याची पद्धत आपल्या देशात आहे. हीच पद्धत पुढे देखील उत्तमरितीने जपायला हवी.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचे स्थान परमेश्वराप्रमाणे आहे. खूप मोठया प्रमाणात युवा वर्ग आपल्या शिक्षकांना व गुरुंना सन्मान देताना दिसत नाही. त्यामुळे गुरुंचे महात्म्य सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्याकरीता गुरुवर्यांचा कृतज्ञता सन्मान संस्थेतर्फे करण्यात आला. तसेच त्यांचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading