Pune – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 50 रुपये लिटर पेट्रोल
पुणे: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक बाळा ओसवाल यांच्या तर्फे प्रभागातील नागरिकांना 50 रुपये मध्ये 1 लिटर पेट्रोल देण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन सचिन जोगदंड प्रभाग क्रमांक 37 मधील शिवसेनेचे शाखाप्रमुख यांनी केले होते. नगरसेवक बाळा ओसवाल यांच्या कार्यालयात पेट्रोलचे कुपन देण्यात आले . प्रभाग क्रमांक 37 मधील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व पेट्रोल घेण्यासाठी प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
सचिन जोगदंड म्हणाले केंद्र सरकारने पेट्रोल ,डिझेल दरवाढ केली आहे .सामान्य माणूस आधीच कोरोना या महामारीमुळे व 2 वर्षे लॉकडाऊन मुळे आर्थिक कोंडीत सापडला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नि सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी , चिपळूण या भागात मुसळधार पावसामुळे जी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी वाढदिवस न साजरा करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले होते. पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे आम्ही आमच्या प्रभागातील नागरिकांना आज 50रुपयात एक लिटर पेट्रोल सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत नागरिकांना आम्ही पेट्रोल देणार आहोत.
