जेसीबी इंडिया – सीईव्ही स्टेज फोरची पूर्तता करणाऱ्या व्हेइकल्सची नवीन श्रेणी सदर
जयपूर :कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्हेइकल्सचे उत्पादन करणाऱ्या जेसीबी इंडिया या भारतातील आघाडीच्या कंपनीने आपल्या सीईव्ही स्टेज फोरची पूर्तता करणाऱ्या व्हील्ड कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्हेइकल्सची पूर्णपणे नवीन श्रेणी बाजारात आणली. ही यंत्रे बाजारात आणल्यामुळे जेसीबी इंडिया ही सीईव्ही स्टेज फोर उत्सर्जन मानकांची पूर्तता करणारी व्हील्ड मशिन्सची संपूर्ण श्रेणी तयार करणारी उद्योगक्षेत्रातील पहिलीच कंपनी ठरली आहे.
या श्रेणीत ३डीएक्स प्लस आणि ४डीएक्स बाको लोडर्स, व्हीएम११७ सॉइल कॉम्पॅक्टर, ५३०७० आणि ५३०११० टेलीहॅण्डरल्स यांचा समावेश होतो. या सर्वांची इंजिने नवीन कार्बन उत्सर्जन नियमांची पूर्तता करणारी आहेत. मोठ्या प्रमाणातील लाची हाताळणी करण्यासाठी तीन नवीन व्हील्ड लोडर्स, ४३३-४, ४३७-४ आणि ४५५४ ही वाहनेही कंपनीने नवीन इंजिनसह बाजारात आणली आहेत.
जेसीबी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक शेट्टी जयपूरमध्ये आयोजित सोहळ्यात म्हणाले,“शाश्वत वाढ हा कायमच आमच्या कामकाजाचा आधारस्तंभ राहिला आहे. व्हील्ड कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्हेइकल्ससाठी आलेल्या सीईव्ही स्टेज फोर उत्सर्जन नियमांचे आम्ही स्वागत करतो. ही नवीन श्रेणी आमच्या पर्यावरण व शाश्वततेप्रती असलेल्या दृढ बांधिलकीचे प्रतीक आहे. या यंत्रांचे कार्बन उत्सर्जन कमी आहेच, शिवाय ही यंत्र अधिक इंधनकार्यक्षम आहेत. त्यामुळे उपकरण बाळगण्याचा एकूण खर्च कमी होतो.”
या यंत्रांमध्ये जेसीबी लाइव्हलिंक म्हणून ओळखले जाणारे जेसीबीचे प्रगत टेलीमॅटिक्स तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. हे क्रांतीकारी तंत्रज्ञान यंत्राच्या स्थानासह त्याची कामगिरी, त्याचे कार्यान्वयन व आरोग्याच्या निकषांबाबतही रिअल-टाइम अपडेट्स देते. उपकरणे जिओफेन्स्ड, टाइमफेन्स्ड असू शकतात आणि जीपीएसद्वारे लोकेट केली जाऊ शकतात. आजच्या तारखेपर्यंत सुमारे १,८०,००० लाइव्हलिंक एनेबल्ड जेसीबी यंत्रांची विक्री झाली आहे. यामुळे ग्राहकांच्या यंत्रांचा ताफा व्यवस्थापित करण्याच्या पद्धतीत बदल घडून आला आहे.
दीपक शेट्टी पुढे म्हणाले, “संरचना प्रकल्पांसाठी चोवीस तास काम सुरू ठेवावे लागते आणि अशा परिस्थितीत ग्राहकांना कायम त्यांच्या यंत्रांच्या ताफ्याच्या संपर्कात राहणे किती महत्त्वाचे हे आमच्या लक्षात आले. जेसीबी लाइव्हलिंकमुळे हे शक्य झाले आहे. आमच्या उत्पादनांमधील डिजिटल तंत्रज्ञानाच्या एकात्मीकरणासाठी गुंतवणूक केल्यामुळे जेसीबी उत्पादन बाळगण्याचा अनुभव जागतिक दर्जाचा झाला आहे आणि हा अनुभव भविष्यकाळात आणखी चांगला होणार आहे.”
