‘नवीन महिंद्रा सुप्रोप्रॉफिट ट्रक’ बाजारात दाखल
मुंबई : भारतातील अव्वल स्थानावरील व्यावसायिक वाहन उत्पादकांपैकी एक, तसेच तीनचाकी वाहनांपासून ते 55 टन क्षमतेच्या एचसीव्ही ट्रक्सपर्यंतच्या उत्पादनांची व सोल्यूशन्सची विस्तृत श्रेणी असलेली कंपनी, महिंद्रा अॅंड महिंद्रा लि., हिने आपल्या नुकत्याच सादर केलेल्या ‘सुप्रोप्रॉफिट ट्रक’ या श्रेणीतील लहान व्यावसायिक वाहनांसाठी एका अद्वितीय अशा मूल्य प्रस्तावाची घोषणा आज केली. स्वतंत्र प्रमाणपत्रावर आधारावर हे सिद्ध झाले आहे की ‘सुप्रोप्रॉफिट ट्रक’ची इंधन कार्यक्षमता व पेलोडची क्षमता उच्च पातळीवरील असल्याने ग्राहकांना 26 ते 36 टक्के अधिक नफा मिळण्याची संधी आहे. या अत्यंत आकर्षक उत्पादनाची श्रेणी व ऑफर यांसाठी ‘महिंद्रा’ने ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ म्हणून नामांकित अभिनेते व निर्माते अजय देवगण यांना नेमले आहे. हा ब्रॅंड डिजिटल व पारंपारिक माध्यमांद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, याकरीता देवगण हे या ब्रँडशी सहकार्य करणार आहेत.
‘महिंद्रा अँड महिंद्रा लि.’च्या ऑटोमोटिव्ह विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीजय नाक्रा म्हणाले, “ग्राहकांची समृद्धी हाच आमच्या व्यवसायातील या पोर्टफोलिओसाठीचा आमचा मंत्र आहे. ग्राहकांना एकतर आम्ही नफा मिळवून देऊ किंवा हा सुप्रोप्रॉफिट ट्रक परत घेऊ, हा आमचा सुप्रोसाठीचा प्रस्ताव आहे, तो याच तत्वज्ञानाशी निगडीत आहे. सुप्रोमुळे अधिक मायलेज आणि मालवाहतूकीची अधिक क्षमता यांची जी हमी मिळते, यातून तो निर्माण झालेला आहे. अजय देवगण हा कुशल अभिनेता आणि ब्रँड महिंद्रा यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये घट्ट बंध असल्याच्या पार्श्वभूमीवर, या नाविन्यपूर्ण आश्वासनाला व ब्रॅंडच्या नावारुपाला न्याय देऊ शकेल, अशी व्यक्ती देवगण यांच्याखेरीज अन्य कोण असू शकेल?”
‘महिंद्रा अँड महिंद्रा लि.’चे ऑटोमोटिव्ह विभागातील ‘व्यवसाय प्रमुख – एससीव्ही’ अमित सागर म्हणाले, “आमच्या ग्राहकांचे स्वप्न पूर्ण करणारी उत्पादने व सोल्यूशन्स तयार करणे हे आमच्या एससीव्ही श्रेणीच्या गुणसूत्रांमध्येच आहे. नवीन ‘सुप्रोप्रॉफिट ट्रक मिनी’ हे 2 टनांपेक्षा कमी क्षमतेच्या प्रकारात महिंद्रातर्फे देणात येणारे एक शक्तीशाली वाहन आहे, तर ‘सुप्रोप्रॉफिट ट्रक मॅक्सी’ हे वाहन 2 ते 3.5 टन या क्षमतेच्या प्रकारातील स्पर्धेत उतरण्यास सज्ज आहे. बेस्ट-इन-क्लास मायलेज, जास्त पेलोड, अधिक पॉवर आणि ऑल-न्यू ट्रान्समिशन यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे नवीन ‘सुप्रोप्रॉफिट ट्रक’ची श्रेणी ही ‘एससीव्ही 4डब्ल्यू लोड सेगमेंट’मधील आमचे नेतृत्व मजबूत करू शकते.”
