Monday, June 15, 2026
Latest NewsNATIONAL

कोरोना – वाढत्या प्रदूषणामुळे वेगाने पसरतोय विषाणू

नवी दिल्ली : वाढत्या प्रदूषणामुळे कोरोना विषाणू  वेगाने पसरत असल्याची माहिती आता समोर आली आहे. पश्चिम अमेरिकेमध्ये 80 हून अधिक जंगलांमध्ये आग लागलेली पाहायला मिळत आहे. यामुळे निर्माण झालेल्या धुरामुळे आणि त्यापासून होत असलेल्या प्रदूषणामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जंगलात आग लागली त्यावेळी असलेल्या वातावरणात 2.5 मायक्रोमीटरचे छोटे पार्टिकल्स तरंगत होते. याच पार्टिकल्समध्ये संशोधकांना नव्या प्रकारचा कोरोना व्हायरस आढळून आला आहे. संशोधकांनी कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यामागे प्रदूषण जबाबदार असल्याचे म्हटले आहे. जेव्हा जेव्हा प्रदूषणात वाढ झाली तेव्हा तेव्हा कोरोनाचा प्रसार अधिक झाल्याचे म्हटले आहे. डेजर्ट संशोधन संस्थेच्या वतीने हे संशोधन करण्यात आले आहे.

नेवाडा येथील रेनो परिसरात हे संशोधन करण्यात आले. जिथे कॅलिफोर्नियातील जंगलात लागलेल्या आगीमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले होते. जिथे प्रदूषणाचा स्तर उच्च होता, तिथे कोरोनाचा पॉझिटिव्ही रेटही वाढला. या परिसरात प्रदूषण वाढल्याने 18 टक्के अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जास्त तापमान, वायु प्रदूषण, हवामानातील बदल यासारख्या गोष्टी कोरोना रुग्णवाढीस मदत करत आहेत. प्रदूषणाच्या छोट्या छोट्या पार्टिकल्सच्या माध्यमातून कोरोना विषाणूला श्वासामार्फत शरीरात प्रवेश करणे सोपे होते. तुर्कीमध्येदेखील अशाप्रकारचे संशोधन करण्यात आले असून ज्यामध्ये प्रदूषण आणि कोरोनाचा संबंध असल्याचे म्हटले आहे. जंगलात आगीमुळे झालेल्या प्रदूषणाने अमेरिकेत रुग्णसंख्या वाढल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading