Saturday, June 13, 2026
Latest NewsSports

Tokyo Olympics 2020 – … तर मीराबाई चानूला मिळू शकत सुवर्णपदक

टोकियो : ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळवून दिल ते मीराबाई चानूनं. टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग प्रकारात तिने सुवर्ण पदकाची कामगिरी केली. तर चीनी वेटलिफ्टर होऊ जिहुईने सुवर्णपदक आपल्या नावावर केले. पण आता चानूला हरवणाऱ्या होऊ जिहुईची डोपिंग टेस्टिंग केली जाणार आहे.  जर ती या टेस्ट मध्ये फेल झाली तर मीराबाई चानू सुवर्णपदकाची मानकरी ठरू शकते.

मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात रौप्यपदक  मिळवलं आहे. मीराबाई चानूनं शानदार प्रदर्शन करत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात 87 किलो वजन उचललं तर  क्लीन अॅंड जर्कमध्ये मीराबाई चानूनं 115 किलो वजन उचलत पदकावर शिक्कामोर्तब केलं. मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात दुसरं पदक मिळवून दिलं आहे. भारताकडून वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading