Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

Pune – गेल्या 24 तासात 284 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज तर 139 नवीन रुग्णांची नोंद

पुणे: पुणे शहरामध्ये कोरोनाचा  प्रादुर्भाव कमी होत आहे.आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची  संख्या कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 139 नवीन रुग्णांची  नोंद झाली आहे. तर 284रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात  आले आहे.पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 85 हजार 855 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 74 हजार 477 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 8 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8736 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 2642अ‍ॅक्टिव्ह रुग्ण  आहेत.
यामध्ये 225रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4595 स्वॅब  तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading