Tuesday, June 16, 2026
Latest NewsNATIONAL

Karnataka – मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा राजीनामा

बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी आज (26 जुलै) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल यांना सोपवला. त्यामुळे कर्नाटकतील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. येडियुरप्पा यांनी राजीनामा देण्याआधी 35 मिनिटे भाषण केले. यादरम्यान ते भावूक झाले होते व त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते.

या वेळी ते म्हणाले, मी नेहमीच अग्नी परीक्षेतून गेलो आहे.  दरम्यान, कर्नाटकमधील सर्वात प्रभावशाली लिंगायत मठांच्या प्रमुखांनी बी एस येडियुरप्पा यांना हटवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. याचा परिणाम भाजपला भोगावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे

कर्नाटकातील लिंगायत समुदाय सुमारे १७ % आहे. राज्यात २२४ विधानसभा जागांपैकी जवळपास ९० ते १०० जागांवर लिंगायत समाजाचे वर्चस्व आहे. लिंगायत समुदायाचा राज्यातील जवळपास निम्म्या लोकसंख्येवर प्रभाव आहे. अशा परिस्थितीत भाजपाला येडियुरप्पाकडे दुर्लक्ष करणे सोपे होणार नाही. दरम्यान पुढील काळात भाजपने कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून लिंगायत समाजाचे नेते मृगेश निरानी, बसवराज बोम्मई, वोक्कालिगा समाजाचे नेते अस्वथ नारायण, आर अशोक, सी टी रवी आणि प्रल्हाद जोशी यांच्या नावाची चर्चा आहे.

चारवेळा मुख्यमंत्री पण एकदाही टर्म पूर्ण नाही 

येडियुरप्पा कर्नाटकांचे चार वेळा मुख्यमंत्री राहिले. मात्र ते कधीही मुदत पूर्ण करू शकले नाहीत. 12 नोव्हेंबर 2007 रोजी प्रथम कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले, परंतु त्यानंतर सात दिवसानंतर 19 नोव्हेंबर 2007 रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर मे २०० 2008 रोजी ते दुस यांदा मुख्यमंत्री झाले. यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपामुळे 4 ऑगस्ट 2011 रोजी राजीनामा दिला होता. 17 मे 2018 रोजी तिसर्यांदा मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर सहाच दिवसांनी 23 मे 2018 रोजी राजीनामा दिला. 26 जुलै 2019 रोजी चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि बरोबर दोन वर्षांनंतर त्यांनी राजीनामा दिला.२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, . यानंतरही येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विधानसभेत बहुमत सिद्ध न झाल्यामुळे भावनिक भाषणानंतर सत्ता सोडली. त्यानंतर कॉंग्रेसने जद (एस) बरोबर सरकार स्थापन केले. हे सरकारही फार काळ टिकले नाही आणि २०1९ मध्ये येडियुरप्पा पुन्हा मुख्यमंत्री झाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading