राज कुंद्राची कंपनी कानपूरच्या ‘या’महिलेच्या बँक खात्यात ट्रान्सफर करायची कोट्यवधी रुपये
मुंबई – पॉर्नफिल्म प्रकरणात अटकेत असलेला उद्योगपती राज कुंद्रा आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या व्यतिरिक्त कानपूरच्या एका महिलेचं देखील बँक खातं सील करण्यात आलं आहे. या महिलेच्या बँक खात्यात पॉर्न फिल्म निर्मितीच्या उत्पन्नाचे कोट्यवधी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. संबंधित बँक खातं हे हर्षिता श्रीवास्तव नावाच्या महिलेचं आहे. हे बँक खातं जेव्हा सील करण्यात आलं तेव्हा देखील त्या खात्यात 2 कोटी 32 लाख 45 हजार 222 रुपये होते.
मुंबई क्राईम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, हॉटशॉट्सच्या व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये अरविंद कुमार नावाचा एक व्यक्ती आहे. या अरविंदच्या पत्नीचं नावच हर्षिता असं आहे. अरविंद हा फक्त त्याच्या पत्नीच्याच नव्हे तर त्याचे वडील नर्वदा श्रीवास्तव यांच्याही बँक खात्यात कोट्यवधी रुपये ट्रान्सफर करायचा. अरविंद अॅपमधून कमावलेले पैसे आपल्या कुटुंबियांच्या बँक खात्यात का ट्रान्सफर करायचा, याबाबत सध्या तपास सुरु आहे. संबंधित बँक खात्यांचा उपयोग हा सट्टेबाजी किंवा ब्लॅकमनीचा पैसा वळवण्यासाठी करण्यात आल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे. हर्षदा आणि नर्वदा यांच्या बँक खात्यात पैसे आल्यानंतर काही दिवसांनी ते पैसे वेगळ्या खात्यात ट्रान्सफर केले जायचे. संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर आता अरविंदचं बँक अकराउंटदेखील सील करण्यात आलं आहे. या खात्यात तब्बल 1.81 कोटी रुपये होते.
कानपूरच्या बर्रा येथील पंजाब नॅशनल बँकेत हर्षिता श्रीवास्तव नावाचे बँक अकाउंट हे सहा वर्षांपूर्वी उघडण्यात आले आहे. हे अकाउंटला जेव्हा सील केले, तेव्हा 2 कोटी 32 लाख 45 हजार रुपये होते. गेल्या दोन वर्षातच या खात्यातील ट्रान्झेक्शन वाढले होते . तर दुसरे खाते नर्वदा श्रीवास्तव नावाचं बँक खाते हे कँट येथील स्टेट बँकेत आहे. या खात्यात 5 लाख 59 हजार 151 रुपये जमा आहेत.
राज कुंद्राचं पोर्न फिल्म निर्मिती रॅकेट हे पूर्णपणे व्हाट्सअॅप ग्रुपद्वारेच चालायचं. एचएस नावाच्या ग्रुपमध्ये कुंद्रा पैशांच्या देवाणघेवाण विषयी चर्चा करायचा. अरविंद श्रीवास्तव हा याच ग्रुपशी संबंधित आहे. याच ग्रुपमध्ये पैशांच्या देवाणघेवाणवर चर्चा व्हायची. तसेच कुणाच्या खात्यात किती पैसे टाकायचे, याबाबतची चर्चा याच ग्रुपमध्ये व्हायची.दुसरा ग्रुप हा एचएस टेक डाऊन नावाचा होता. या ग्रुपमध्ये कुंद्रा कंटेट आणि कॉपीराईट विषयी चर्चा करायचा.
