Saturday, September 5, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

कोरोना – Corbevax ही स्वदेशी लस लवकरच बाजारात

नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूविरोधात अनेक औषधे आणि लसींवर संशोधन सुरु आहे. यात रशिया, अमेरिका, भारतासह अनेक देशांमध्ये लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. भारतातही सर्वाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. ही लसीकरण मोहिम आता अधिक जलद होण्यासाठी आता भारतात आणखी एक स्वदेशी लस विकसित होणार आहे. ‘Corbevax’ असे या लसीचे नाव आहे. हैदराबादच्या बायोलॉजिकल-ई लिमिटेड या फार्मा कंपनीने ‘Corbevax’ ही नवी लस विकसित केली असून सप्टेंबर अखेरीसपर्यंत ती लाँच केली जाणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे दोन महिन्यांनंतर येणारी ही लस बायोलॉजिकल-ई लिमिटेड कंपनीने विकसित केली आहे. आरबीडी प्रोटिन सब-युनिट असलेल्या या लसीची चाचणी तिसऱ्या फेज मध्ये आहे. आधीच्या दोन फेजमध्ये लसीचे रिपोर्ट प्रभावी आले आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यात ती बाजारात येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading