Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

रिपब्लिकन पक्षात अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश

पुणे : शहरातील रिपब्लिकन पक्षाच्या पुणे शहर युवक आघाडीत ‌ पुणे शहर युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला प्रामुख्याने कोथरूड मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे व वडगाव शेरी मतदार संघातील उच्चशिक्षित कार्यकर्ते रोहन कदम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज प्रवेश केला.

सचिन कांबळे यांची पुणे शहर संघटक पदी तसेच रोहन कदम पुणे शहर सचिव पदी निवड करण्यात आली यावेळी पश्चिम महाराष्ट्र मा. युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर व अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा. आयुब भाई शेख यांच्या हस्ते नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी उपस्थित पुणे शहराचे सरचिटणीस महिपाल वाघमारे व श्याम सदाफुले कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड वरिष्ठ उपाध्यक्ष भगवान गायकवाड वडगाव शेरी मतदार संघाचे अध्यक्ष ऋषिकेश गवळी सरचिटणीस निलेश आगळे विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष सुरज गायकवाड शहर उपाध्यक्ष अमोल शेलार वडगावशेरी मतदार संघाचे अध्यक्ष ऋषिकेश गवळी रमेश तेलवडेअतुल भालेराव संतोष कांबळे शशी मोरे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading