पुणे महापालिका भवनाच्या स्वच्छतेचा खर्च ठेकेदारा मुळे झाला निम्मा

पुणे: पुणे महापालिका प्रशासनाने महापालिका भवनाची नवी व जुनी इमारत स्वच्छ करण्यासाठी 3 कोटी 11 लाख रुपयांचा खर्च काढला होता मात्र निविदा भरताना हे काम ठेकेदाराने फक्त 1 कोटी 55 लाख रुपयात करण्याची तयारी दाखविल्याने हा खर्च निम्म्याने कमी झाला आहे .लोकराज्य स्वयं रोजगार सेवा सहकारी संस्थेस हे काम देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

पुणे महापालिकेच्या जुन्या व नवीन इमारतीमधील
पॅसेज शौचालय ,मुख्य सभागृह, स्थायी सभागृह, विशेष समिती सभागृह ,महापौर यांचे कार्यालय जुन्या व नवीन इमारतीच्या बाहेरील बाजूच्या साफसफाईच्या कामासाठी निविदा मागविण्यात आली होती .या कामासाठी चार ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या .त्यापैकी दोन निविदा अपात्र ठरल्या तर दोन निविदा पैकी एकाने 36.6 टक्के कमी दराने निविदा सादर केली होती. तर लोकराज्य संस्थेने 50 टक्के कमी दराने भरली होती. राज्यसंस्था केवळ एक कोटी 55 लाख रुपयात हे काम वर्षभर करणार असल्याने त्यास मान्यता देण्यात आली.

याबाबत बोलताना स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले ही निविदा कमी रकमेची असते ती मान्य करावि लागते .त्यानुसार ही पन्नास टक्के कमी दराने आलेली  निविदा मान्य केली प्रशासनाने निश्चित केलेल्या रेकमे पेक्षा हा ठेकेदार कमी पैशात काम करणार आहे. पण त्यांच्याकडून दर्जेदार काम करून घेण्याची जबाबदारी आता प्रशासनाची आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: