Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

रुग्णांना लुटणाऱ्या रुग्णवाहिकावर कारवाई करा- शरद कात्रजकर

पुणे: रुग्णांची लूट अडवणूक करणारे जे काही रुग्णवाहिका चालक मालक आहेत ते कोविड क्षेत्रात आले आहेत व पुणे जिल्ह्यात भरपूर असे मालक-चालक आहेत त्यांच्या गाड्या रुग्णवाहिका नसून खाजगी प्रवासी वाहतुकीच्या गाड्या आहेत. आणि या राजरोसपणेपने पणे आजही रुग्ण वा हीकांचा दिवा व भोंगा लावून  फिरताना दिसत आहे. अश्या खाजगी प्रवासी गाड्यावर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय ने कारवाई करण्याची मागणी महाशक्ती ॲम्बुलन्स चे अध्यक्ष शरद कात्रजकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अमोल महाडिक, सचिव राजेश सानप, शिवरत्न मिटकरी उपस्थित होते.
कोविड काळात पुणे जिल्ह्यात रुग्णवाहिका
यांचा खूप मोठ्या प्रमाणात तूटवडा जाणवला होता. आणि याच परिस्थितीत खाजगी रुग्णवाहिका वर मोठ्या प्रमाणावर विविध गोष्टीसाठी टीकाही झाली होती. तरीही न डगमगता काम करत राहिलो पण हल्ली आमच्या महा शक्ती असोसिएशन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा असे निदर्शनास आले आहे की काही गाड्यांचे स्पीडमीटर किलोमीटर मशीन याला छेडछाड करून फास्ट करण्यात आले आहे. याकडेही पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने लक्ष घालावे .अशी मागणी शरद कात्रज कर यांनी केली.

स्टेशनला मृतदेह सोडण्यासाठी, शव घेण्यासाठी खाजगी रुग्णवाहिका ससून रुग्णालयाच्या आवारात गेली .असता दहा ते पंधरा मिनिटे रुग्णवाहिका थांबले की लगेच येथील सुरक्षारक्षक रुग्णवाहिकेला आर्थिक दंड वसुलीचा तगादा लावतात व ड्रायव्हरला शिवीगाळ व अरेरावी करतात तरी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या साहेबांनी या अडचणीं वर मार्ग काढावा अशी मागणी शरद कात्रजकर यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading