fbpx
Saturday, April 27, 2024
Latest NewsPUNE

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांच्यावतीने गरजूंना शिधा वाटप

पुणे : माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना गजानन एकबोटे आणि भाजपा युवती आघाडी अध्यक्षा ,पुणे प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे यांच्या माध्यमातून प्रभागातील गरजू कुटुंबाना कोविडच्या पार्श्वभूमीवर दीड महिना पुरेल एवढ्या शिधा साहित्याच्या वाटपाचा कार्यक्रम नुकताच रेव्हेन्यू कॉलनी येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमास शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे , प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे , माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे , समृद्धी नंदकिशोर एकबोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले की , कोविड महामारीमुळे सर्वसामान्य कुटुंबांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक झळ बसलेली आहे. नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य कुटुंबांबरोबरच ज्या घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन कोविडमुळे झालेले आहे अश्या कुटुंबांनादेखील शिधा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे . असे स्तुत्य उपक्रम यापूर्वीही त्यांच्या मार्फत मतदार संघात राबविले गेले आहेत आणि भविष्यातही त्या सर्वसामान्य कुटुंबांचा आधार होतील अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

प्रा.डॉ. गजानन एकबोटे म्हणाले की, कोरोना महामारीचे संकट अद्यापही कमी झालेले नाही. नागरिकांनी कोविडच्या सर्व नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर कुटुंबातील सर्व व्यक्तींचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. प्रा.ज्योत्स्ना एकबोटे यांच्यासारखे आदर्श लोकप्रतिनिधी असे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत असतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मदत मिळते. नागरिकांना उपयुक्त असे उपक्रम भविष्यातही त्यांनी राबवावेत असे मत त्यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजन देवकाते, दत्तात्रय पाटोळे, ऋषिकेश कोंढाळकर, मंगेश नलावडे, अमृत कदम, उमेश गोरे, विलास लाड, सुरज दरेकर, प्रकाश साबळे, यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading