Pune – इंधन दरवाढ, महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन

पुणे: पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकारने केलेल्या महागाईचा” निषेध करण्यासाठी  महागाई विरोधी   काँग्रेसने आज पुण्यात अभिनव आंदोलन केले . मोदी सरकारने पेट्रोल डिझेल गॅस  जी दरवाढ केली आहे त्या विरोधात पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज राष्ट्र भूषण चौक खडकमाळ येथे काँग्रेसने आंदोलन केले.


या आंदोलनाला पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सचिव संजय बालगुडे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर माजी मंत्री काँग्रेस, माजी महापौर कमल व्यवहारे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

मोहन जोशी म्हणाले,  2014 सालापासून मोदी सरकार सतेत आहे. मोदी सरकारने पेट्रोल डिझेलचे दर तेव्हापासून वाढवले आहेत राज्यातील विरोधी पक्ष म्हणते की आम्ही पेट्रोल-डिझेल चे दर कमी करायला सांगू पण ते काही होताना दिसत नाही आमच्याकडे एक ऑडिओ क्लिप आहे ती आम्ही जनतेला दाखवणार आहोत जर केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल गॅस  चे दर कमी केले नाहीत तर त्यांना जनता आता दाखवून देईल. 

2014 ते 2019 या पाच वर्षात मोदी सरकारने पेट्रोल डिझेलचे दर वाढविले कोरोना मुळे पेट्रोल डिझेल गॅस  चे दर वाढल्यामुळे सामान्य जनतेला आर्थिक समस्याचा सामना करावा लागत आहे बेकारी पण भरपूर वाढली आहे दोन हजार कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत शेतकऱ्यांकडे मोदी सरकार लक्ष देत नाही तरुणांना रोजगार पाहिजे ते मोदी सरकार देत नाही महागाई तर शंभर टके च्या च्या पुढे गेली आहे त्यामुळे सामान्य माणूस रस्त्यावर आला आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आम्ही आज अभिनव आंदोलन करत आहोत.


या आंदोलनामागे आमचा हेतू हाच आहे मोदी विचारतायत पेट्रोल डिझेल चे भाव कमी झाले का सामान्य जनता म्हणते नाही मोदी विचारतात तरुणांना नोकऱ्या मिळाल्या का जनता म्हणते नाही सामान्य जनतेला महागाईतून सूट मिळावी हाच आमच्या आज आंदोलनाच्या माध्यमातून हेतू आहे असे आंदोलनाच्या वेळी संजय बालगुडे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: