प्रत्येक खेळाडूने आत्मविश्वासाने खेळले पाहिजे – धनराज पिल्ले

पुणे : आज जपानच्या टोकियो शहरात ऑलिंपिक स्पर्धेसाठी जे खेळाडू गेले आहेत ते नक्कीच जिंकून येथील असा मला आत्मविश्वास आहे .ऑलिंपिक स्पर्धेत टेनिस, हॉकी, फुटबॉल हे खेळ असतात मी झेव्हा हॉकी ऑलम्पिक स्पर्धेत खेळलो आम्ही अंतिम स्पर्धत पण विजय मिळवला होता. तसाच प्रत्येक खेळाडूने आत्मविश्वास ठेवून अंतिम फेरीत जाऊन विजय मिळवला पाहिजे, असे  माजी हॉकीपटू धनराज पिल्ले म्हणाले.

उद्यापासून (23जुलै) टोकियो येथे  सुरू होता असलेल्या ऑलम्पिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यात कार्यक्रम  डेक्कन येथील जिमखाना हॉल येथे पार पडला. यावेळी धनराज पिल्ले बोलत होते.  याप्रसंगी माजी ऑलम्पिक  खेळाडूचा पुणे जिल्हा अथलेटिक असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा अथलेटिक असोसिएशन चे अध्यक्ष अभय छाजेड यांसह अनेक माजी खेळाडू उपस्थित होते. 

‘मी तरुण असताना ऑलम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेतला होता तेव्हा जपानमध्ये ऑलम्पिक स्पधे मध्ये भाग घेतला होता तेव्हा मला प्रथम पारितोषिक बक्षीस मिळाले होते आज मला खूप आनंद होत आहे. मागच्या आठवणी या आज जाग्या झाल्या आज ऑलम्पिक स्पर्धेसाठी जे खेळाडू चालले आहेत ते नक्की जिंकून येथील असा मला आत्मविश्वास आहे.’, असे माजी खेळाडू बाळकृष्ण आकोटकर म्हणाले.

‘खेळाडू वर्षानुवर्षे डेक्कन जिमखाना ग्राउंड वर प्रॅक्टिस करतात यावर्षी कोरोना मुळे ही स्पर्धा होईल की नाही याबाबत मला जरा चिंता वाटत होती पण टोकियो सरकारने ही स्पर्धा घेण्याचे ठरविले याचा मला खूप आनंद होत आहे’, असे अभय छाजेड म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: