‘सिटी ऑफ ड्रीम्स – सीजन २’चा ट्रेलर रिलीज

सस्पेन्स, थ्रिलर आणि ऍक्शने परिपूर्ण असलेल्या पॉलिटिकल ड्रमा अर्थात ‘सिटी ऑफ ड्रीम्स – सीजन २’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. अभिनेत्री प्रिया बापटने स्वतः हा ट्रेलर आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेयर केला आहे. या मालिकेच्या पहिल्या भागानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. मराठी आणि हिंदी अशा दोन भागात ही मालिका प्रदर्शित झाली होती. त्यात मराठी अभिनेत्री प्रिया बापट, अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिकेत आहेत. पॉलिटिकल ड्रामा म्हणून ही मालिका अनेकांच्या चर्चेचा विषय होती. या सिजनच्या पहिल्या भागात आपल्याला गायकवाड कुटुंबातील भाऊ आणि बहिणी मधील वाद पाहायला मिळाला होता. मात्र आता दुसऱ्या भागात बाप आणि लेकी मधील राजकीय वाद पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: