आशिष शेलारांकडून अजब समर्थन, म्हणाले राज्याने कर कमी करावा केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलचा पैसा सामाजिक कार्यात वापरते

पुणे: देशात पेट्रोल – डिझेल च्या दराने शंभरी पार केल्याने सामान्य जनतेला झळ बसत आहे. मात्र जनतेला वाऱ्यावर सोडून कुणी कर कमी यावर चर्चा करण्यात भाजप नेते गुंतलेले दिसतात. भाजप नेते आशिष शेलार यांनी तर पेट्रोल दरवाढी चे समर्थन करत जनतेच्या जखमेवर मीठ चोळले.

शेलार म्हणाले की, केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल च्या बाबतीत जो कर लावलाय केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल चा जो पैसा येतोय तो ते सामाजिक निधी साठी वापरत आहे राज्य सरकार पेट्रोल डिझेल वरील जो 40 टक्के टॅक्स भेटतो आमच्या विरोधी पक्षाची भूमिका हीच आहे की पेट्रोल डिझेल चा टॅक्स 90 टक्के करावा अशी आमची भूमिका आहे. आज पुण्यातील सारसबाग येथील सणस ग्राउंड वरील सेल्फी पॉइंट चे उद्घाघाटन करताना आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.

दरम्यान, मुंबईमध्ये ज्या उंच उंच इमारती ज्या भूगाल प्रदेशात आहेत हयावर खरेतर डिजास्टर मॅनेजमेंटने ज्या उंच उंच इमारती पडू नये यासाठी व्यवस्थित नियोजन करायला पाहिजे होते पण तसे काही होताना दिसत नाही. दुर्देवाने त्यात  30 बळी गेले आहेत . पुणे महानगरपालिकेची माहिती जी माझ्यासमोर आहे पुण्याच्या महापौरांनी मला माहिती सांगितल्याप्रमाणे पुणे महानगरपालिकेने अशी कोणती घटना घडू नये म्हणून त्याचे नियोजन केले आहे,अशी कोणती घटना घडली तर पुणे महानगरपालिका योग्य पद्धतीने काम करेल असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

तसेच, भारतीय संघ ऑलम्पिक मध्ये यशस्वी कारकीर्द करेल यासाठी समस्त भारत वासी यांच्या प्रेरणा मांडलेल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी नी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. पुण्यात आमच्या महानगरपालिकेच्या वतीने खेडेकर साहेब,
महापौर मुरलीधर मोहोळ असतील त्यांच्या प्रयत्नातून हा सेल्फी पॉइंटचे उद्घाघाटन केले आहे भारतीय संघाचे उत्सव वाढवण्यासाठी जागोजागी सेल्फी पॉइंट उभारले आहेत त्यातून सर्व समावेश पण होईल असे अशिष शेलार म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: