पेट्रोल-डिझेलबाबत जीएसटी परिषदेत चर्चा नाही – अर्थ राज्यमंत्री

नवी दिल्ली :  पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबत कोणत्याही राज्यांकडून प्रातिनिधीक मागण्या आलेल्या नाहीत. त्यामुळे याची जीएसटी परिषदेत आतापर्यत कोणतीही चर्चा झालेली नाही अशी माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज सोमवारी दिली.

याबाबत पाच खासदारांनी लोकसभेच्या सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर पंकज चौधरी म्हणाले की, पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणायचे असेल तर त्यासाठी जीएसटी परिषदेने तसा प्रस्ताव आणणे गरजेचे असते. मात्र अद्याप राज्यांनी प्रतिनिधीत्व असलेल्या जीएसटी परिषदेत अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव मांडलेला नाही.

दरम्यान, पेट्रोलिअम पदार्थ्यांच्या किंमतींबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ मंत्रालयानं सांगितलं की, पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती या आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडलेल्या असतात. विविध निकषांद्वारे तेल कंपन्या त्यांच्या किरकोळ विक्रीचा दर निश्चित करतात. यामध्ये तेलाचा आंतरराष्ट्रीय दर, एक्सचेंज रेट, कर रचना, स्थानिक कर आणि इतर बाबी यांचा विचार केला जातो.

Leave a Reply

%d bloggers like this: