जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटचा इयत्ता १० वी चा निकाल १०० टक्के

पुणे : न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्च्या पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल, प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर माध्यमिक विद्यालय आणि शार्दुल सुधाकरराव जाधवर माध्यमिक विद्यालयाचा एसएससी बोर्ड १० वी चा निकाल १०० टक्के लागला आहे. अनुक्रमे श्रेया बोडा, निशा शिंदे आणि निकिता लोहोकरे या तिघी तिन्ही शाळांमधून प्रथम आल्या असून यंदा मुलींनी मोठया प्रमाणात बाजी मारली आहे.

जाधवर ग्रुपचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह सर्व प्राचार्य, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूलच्या श्रेया बोडा (९३.६० टक्के), धीरज शिंगटे (९२.२० टक्के) आणि पीयुष जाधव (९०.२० टक्के) गुण मिळविले आहेत. प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर माध्यमिक विद्यालयातील निशा शिंदे हिला ८९.६० टक्के, तन्वी चव्हाण हिला ८३.८० टक्के आणि वैष्णवी पोफळे हिला ८२.८० टक्के गुण मिळाले आहेत. तर, शार्दुल सुधाकरराव जाधवर माध्यमिक विद्यालयातील निकिता लोहोकरे (९७.६० टक्के) हिने प्रथम, वैष्णवी शिंदे (९५.८० टक्के) द्वितीय व ईश्वर ढोले (९५.२० टक्के) याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: