राज ठाकरे यांचे मिशन महापालिका- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस पुणे दौऱ्यावर

पुणे: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तीन दिवसीय पुणे शहर दौऱ्याला सुरुवात होत आहे. मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने या दौऱ्याची जय्यत तयारी शहरात केलेली दिसते आहे.

येत्या सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे शहर आणि परिसरातील नियोजित दौऱ्याला सुरुवात होत असून सोमवार मंगळवारी बुधवार असे तीन दिवस राज ठाकरे हे पुण्यात कार्यकर्त्यांच्या तसेच मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. आगामी काळात येऊ घातलेल्या महानगर पालिकेच्या निवडणुका बघता हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असून तब्बल तीन दिवस पुणे शहराला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेळ दिल्याने शहर कार्यकारिणी बरोबरच पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी आज पत्रकार परिषदेत या दौऱ्याविषयी अधिक माहिती  दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: